अकोला: पातुर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एम आय एम पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आरीफ खान, नसिब खान, अस्लम खान, रुम खान, शेख जावेद, शेख इब्राहिम, शेख सिंकदंर, शेख मनुहर, शेंख अतिक, शेख अजगर, शेख इरफान, शेख मुसा, अब्दुल रिजवान, अब्दुल जजिल, शेख समिर शेंख मुरतुजा, मो.दानिश, मो.रशिद यांनी युवा नेते, सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश पातुर शहर येथे, अध्यक्ष मोहम्मद जैद मोहम्मद सईद हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि MIM , मध्ये कार्यरत होते.
तसेच जगदंबा आखाडा शिवाजी पार्क येथील युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. या पुर्वी हे कार्यकर्ते काँग्रेस आणि BJP येथे कार्यरत होते. संतोष पाटील, निलेश निंबाळकर, तेजस लोखंडे यांनीही वंचित बहुजन आघाडी मध्ये आज प्रवेश केला.
अकोला शहरातील इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावरील अकोल्यातील जनतेचा विश्वास दृढ होताना देखील पाहायला मिळत आहे.