युवा आघाडी ने चालवल्या भाजपचे डूबत्या कागदी जहाज..!
अकोला : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अंडरपास च्या नावाने सदोष रस्ता बांधण्यात आला. या रस्त्यावर वर्ष भर पाणी साचून राहते. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी ने 12 महिन्यांपूर्वी आयुक्तांकडे माशांचे बीज टाकून तलाव १ रु भाडेतत्त्वावर देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले होते.परंतु त्यावर महापालिका प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. शहरातील विविध भागांतून नागरीकांच्या या सदोष रस्त्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. या सदोष रस्त्याच्या बांधकामात भाजपने भ्रष्टाचार केला असा आरोप करत. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या नेतृत्वाखाली सदोष अंडरपास बांधकामाची चौकशी व्हावी यासाठी या अंडरपास मध्ये भाजप पदाधिकारी यांच्या नावाच्या कागदी जहाजी बनवून त्या नाल्यात सोडण्यात आल्या. “रस्त्याचे पैसे कुणी कुणी खाल्ले, भाजपने खाल्ले भाजपने खाल्ले” अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, दादाराव पवार, आशिष मांगुळकर, मिलिंद दामोदर,रितेश यादव, ऍड मिनल मेंढे, ऍड प्रशिक मोरे, ऍड सुबोध डोंगरे, निर्भय पोहरे,निलेश इंगळे, आनंद खंडारे, संतोष वनवे,अमोल जामणिक, जिया शहा, आशिष रायबोले, सपकाळ, संदीप वानखडे, अक्षय राठोड, ऋषिकेश खंडारे,निकि डोंगरे,रक्षक जाधव,महेश शर्मा, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.