अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. काँग्रेसने आम्हाला जे पत्र दिले आहे, त्यावर नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे. आम्हाला शंका आहे की, नाना पटोले यांना कोणाला सहभागी करून घ्यायचे अधिकार दिले आहेत किंवा नाही दिले आहेत याची स्पष्टता आम्ही काँग्रेसला मागत आहोत.
नाही, तर नाना पटोले एक करतील आणि काँग्रेस दुसरं काही करेल यात खूप अंतर होईल. असे त्यांनी म्हटले आहे.
कारण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले होते की, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना आघाडीच्या निर्णयाचे अधिकार दिले असल्याचे सांगितले होते. कालची ती सही त्यांची व्यक्तिगत असेल असेही त्यांनी नमूद केले आहे.