साफसफाई आणि स्वाक्षरी अभियान राबवणार.
अकोला : शहरातील एकमेव असलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने अकोला शहरामध्ये साफसफाई अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी शहरातील 21 मुख्य चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. इन्कम टॅक्स, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिंधी कॅम्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, डाबकी रोड, गांधी चौक, टॉवर चौक, सिविल लाईन्स चौक मोठी उमरी चौक अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन चौक, हनुमान चौक, जठारपेठ चौक, शिवाजी पार्क चौक, जवाहर नगर चौक, शिवनी चौक रतनलाल प्लॉट चौक, महाकाली/ नेहरू पार्क, शिवर चौक या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील बैठक आज यशवंत भवन येथे पार पडली.
या बैठकीला मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, माँ साहेब राजमाता जिजाऊ सभागृह अकोल्याच्या वैभवात भर घालणारी वस्तू आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या सभागृहाची हालत अतिशय दयनीय झालेली आहे. या सभागृहाची साफसफाई व्हावी, या सभागृहाची पवित्रता कायम राखण्यासाठी शासनाने योग्य पावली उचलावीत यासाठी वंचितच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, राजकुमार दामोदर, महिला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान, पूर्व युवा अध्यक्ष जय तायडे, शोभाताई शेळके, किरणताई बोराकडे, ॲड नरेंद्र बेलसरे, विकास सदाशिव हे उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक निलेश देव यांनी केले तर, आभार प्रदर्शन सचिन शिराळे यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.