पुणे: भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेचा कार्यक्रम पुण्यातील कोरेगाव पार्क येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा अनिताताई चव्हाण यांच्या अध्यक्षेतेखाली 26 डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी 7 ठरावांचे वाचन करण्यात आले.
भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केली. या देशातील सर्व स्त्रीयांना गुलमागिरीतून आणि स्त्रीला शूद्र मानणाऱ्या मनुच्या कायद्यातून मुक्त केले आणि संविधानाच्या माध्यमातून स्त्री ला सामान दर्जा, समान अधिकार प्रदान केले म्हणून हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका फडतरे पुणे शहर महासचिव आणि प्रास्ताविक ॲड. रेखा चौरे महासचिव पुणे शहर, यांनी केले. ॲड. अरविंद तायडे, सुनिल धेंडे – महासचिव पुणे शहर, रफिक शेख – संघटक, युवा अध्यक्ष सोमनाथ पानगावे, महासचिव शुभम चव्हाण, ॲड. किरण कदम, वडगाव शेरी वि. अध्यक्ष विवेक लोंढे, महेश कांबळे, जितेंद्र मोरे, सुजाता ओव्हाळ, हसीना सय्यद आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
पुणे शहर महिला उपाध्यक्ष प्रतिभा कांबळे, उषा भिंगारे, त्रिशाली गायकवाड, प्रतिमा कांबळे, निरंजना सोनवणे, सविता चाबुकस्वार, विजया ओव्हाळ, मंगल पायाळ आदी माहिलांनी ठरावाचे वाचन केले.