Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा वापर करत ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 9, 2023
in राजकीय
0
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा वापर करत ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट !
       
मुंबई : आझाद मैदान मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि. ८ डिसेंबर रोजी शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले होते. आज ॲड. प्रकाश आंबेडकरांनी याबाबत ट्विट करत कालच्या सभेत केलेल्या मागण्यांना अधोरेखीत केले आहे.

काल वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या सभेत, विविध धार्मिक समुदायांच्या प्रतिनिधींनी भारत सरकारला गाझावरील इस्रायलच्या युद्धाचा तात्काळ आणि बिनशर्तपणे निषेध करण्याची, पॅलेस्टिनी लोकांसाठी बिनशर्त एकता व्यक्त करण्याची व लोकांची सामूहिक शिक्षा थांबवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कायमस्वरुपी युद्ध थांबवण्याची देखील मागणी केली असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा सूचक वापर केलाय. पॅलेस्टाईनमध्ये टरबूज हे लोकप्रिय फळ आहे. तसेच टरबुजात पॅलेस्टाईनच्या झेंड्यातील चार रंगाचा समावेश आहे. त्यामुळेसुद्धा पॅलेस्टाईन जनतेमध्ये हे फळ लोकप्रिय आहे.

इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षावर वंचित बहुजन आघाडी सतत लक्ष वेधतोय. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचे देशावर आणि जगावर काय परिणाम होतील? याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण देखील त्यांच्या भाषणात केले होते.

Tags: centralgovernmentisraelpalestinePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती – फारुक अहमद

Next Post

चोहट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा ‘ वंचित’ च्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फुटला.

Next Post
चोहट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा ‘ वंचित’ च्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फुटला.

चोहट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा ' वंचित' च्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फुटला.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन
बातमी

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

by mosami kewat
August 16, 2026
0

मुंबई : घाटकोपर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी...

Read moreDetails
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026
कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

August 16, 2026
कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home