Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 28, 2023
in बातमी
0
पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा !
       

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पॅलेस्टाईन – इस्राईल मुद्द्यावर मुंबईत वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी आणि धर्मगुरूंनी एकत्र येत शांती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. ही सभा ८ डिसेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणे येथील महात्मा फुलेवाडा येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले व महात्मा फुले वाड्याची पाहणी ही केली. यावेळी त्यांची पत्रकार परिषद पार पडली.

इस्राईल – पॅलेस्टाईन युद्धाची व्याप्ती वाढली तर याचा भारतावर परिणाम होईल, आखाती देशात ५ कोटींच्यावर भारतीय लोक राहतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारला ओझं उचलावचं लागेल अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली. आंतरराष्ट्रीय मुद्द्याकडे धर्माच्या चष्यम्यातून न पाहता सर्वधर्मियांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकरांनी केले आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून संघर्ष होताना दिसत आहे. यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की, ज्यांचा ओबीसीच्या लढ्याशी संबंध नाही असे लोक काहीही वक्तव्य करून राज्यात दंगल कशी होईल अशी परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. यावर ओबीसींना सतर्क राहण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर सरकार कोणाचं येईल ते सांगता येणार नाही मात्र, या देशाचे पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील एवढं मी खात्रीने सांगतो अस भाकितही ॲड. आंबेडकरांनी व्यक्त केले.

छगन भुजबळांना जेलबाहेर काढणारा मी – ऍड प्रकाश आंबेडकर

यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला आहे. भुजबळ हे मंडल कमिशनच्या विरोधात होते. छगन भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मीच आहे. मी न्यायाधिशाला फटकारले नसते तर, छगन भुजबळ जेलच्या बाहेर आले नसते. पण भुजबळांनी कधी आभार मानले नाहीत असे त्यांनी सांगितले. आंबेडकरवाद – फुलेवाद – शाहुवाद याला कोणा व्यक्तीची गरज नाही. या विचारात खूप ताकद असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यात कधीही दंगली घडू शकतात, स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. संविधान कोणीही बदलणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र हे मोहन भागवतांचे वक्तव्य आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत –

जरांगेंनी मध्यंतरी एक वक्तव्य केले होते. त्यातील शब्द ॲड. आंबेडकरांच्या सल्ल्यामुळे त्यांनी मागे घेतले. या त्यांच्या भूमिकेचे ॲड. आंबेडकरांनी स्वागत केले आहे.

ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीला पाठिंबा –

ओबीसी समजाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करत आहेत. त्या विद्यार्थी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.


       
Tags: israelMaharashtraMaratha ReservationmumbaipalestinePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अवकाळी पावसाच्या कठीण काळात ॲड. प्रकाश आंबेडकर शेतकऱ्यांच्या पाठीशी!

Next Post

महात्मा ज्योतिराव फुले पर्यायी समाज व्यवस्थेचे शिल्पकार..!

Next Post
महात्मा ज्योतिराव फुले पर्यायी समाज व्यवस्थेचे शिल्पकार..!

महात्मा ज्योतिराव फुले पर्यायी समाज व्यवस्थेचे शिल्पकार..!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘मराठा-ओबीसींची ताटे वेगळी ठेवा’; हैदराबाद गॅझेटच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बातमी

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलकाची आत्महत्या; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी कुटुंबीयांना दिला दिला

by mosami kewat
September 13, 2025
0

सालातूर : ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या निषेधार्थ रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड (वय ३५) या ओबीसी समाजातील तरुणाने...

Read moreDetails
NEW GST Rates : जीएसटी प्रणालीमध्ये बदल, २२ सप्टेंबरपासून ‘या’ वस्तू महागणार!

NEW GST Rates : जीएसटी प्रणालीमध्ये बदल, २२ सप्टेंबरपासून ‘या’ वस्तू महागणार!

September 13, 2025
Nepal Next PM : नेपाळमधील जनआंदोलनानंतर सत्तापालट; सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

Nepal Next PM : नेपाळमधील जनआंदोलनानंतर सत्तापालट; सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

September 13, 2025
Russia Earthquake : रशियाच्या कमचटकाजवळ ७.४ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या धोक्याची शक्यता

Russia Earthquake : रशियाच्या कमचटकाजवळ ७.४ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या धोक्याची शक्यता

September 13, 2025
Beed Protest : वंचित बहुजन आघाडीचा गेवराईत ‘जन आक्रोश’ महामोर्चा

Beed Protest : वंचित बहुजन आघाडीचा गेवराईत ‘जन आक्रोश’ महामोर्चा

September 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home