अकोला :शहरात १५ नोव्हेंबरला एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली होती.सदर घटनेची माहिती १७ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना मिळताच त्यांनी यावर ऍक्शन घेत पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. या प्रकरणातील पीडीतेला खदान पोलीस ठाण्यात सुमारे १२ तास वैद्यकीय चाचणी शिवाय ताटकळत ठेवण्यात आले होते. सदर पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षकाने असे काही घडलेच नाही असे म्हटल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक संबंधित अधिकाऱ्यांवर दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे संबंधित अधिकारी, आरोपीच्या समर्थनार्थ येणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला सरंक्षण द्यावे,पंधरा दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करावे. अशी मागणी त्यांनी केली.