डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) मधील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्याच्या ऑनलाईन परीक्षे मधे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या घोळ आणि अनियमितता विरोधात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सातत्याने पाठपुरावा करून परीक्षे मधील अनियमितता बाबत तक्रार करीत होते.मात्र त्यांचे तक्रार कुणीही गंभीर घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी वंचित युवा आघाडीचे पदाधिकारी ह्यांना पाचारण केले.त्यावर युवा आघाडीने योजना कक्ष अधिकारी स्नेहल भोसले व इतर अधिकारी ह्यांना धारेवर धरून विद्यार्थ्यांनी दिलेले पुरावे आणि केलेले आरोप ह्यांची चौकशी करून तो वर परीक्षेचा निकाल स्थगित ठेवण्यास बजावले.सर्व अधिकारी पब्लिक सर्व्हेंट आहेत, ह्याचें भान जपून barti मधील विद्यार्थी ह्यांचे सोबत वागणूक देण्याची तंबी देखील आज दिली.परीक्षा घेणारी कंपनी बाबत अत्यंत गंभीर आरोप असताना देखील बार्टि प्रशासन दखल घेत नसल्याने युवा आघाडीने ह्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती मागितली असून परीक्षा केंद्र वरील फुटेज तपासणी, परीक्षे दरम्यान त्या केंद्रात सुरू असलेले मोबाईल ह्या सर्वाची माहिती सायबर कडून मागण्यास भाग पाडले असून ही परीक्षा रद्द करून ती ऑफलाईन घेण्यास बाध्य पाडू असा इशारा देखील युवा आघाडीने दिला आहे.
ह्यावेळी राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश, युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील,प्रदेश सदस्य विशाल गवळी, पुणे शहर युवा अध्यक्ष परेश शिरसंगे, पिंपरी चिंचवड युवा शहर अध्यक्ष चंद्रकांत लोंढे, पुणे युवा महासचिव शुभम चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.