मुंबई – वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर व गौतम हराळ यांच्यावर मुंबईतील दादर परिसरात भ्याड हल्ला करण्यात आला होता. यात रनशूर आणि हराळ दोघेही गंभीर जखमी झाले होते.
आज मुंबईतील केईएम रुग्णालयात जाऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट घेतली व त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
यावेळी DCP प्रशांत कदम उपस्थित होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी ह्यावेळी DCP यांच्याशी चर्चा केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच 4 जणांना अटक केली. त्यात त्यांनी कबूल केले की, त्यांना हल्ला करण्यासाठी पनवेलचा माजी उपमहापौर जगदीश गायकवाड याने सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.