Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ऍड. प्रकाश आंबेडकरांकडून पक्कं घर नसलेल्या सरपंचाला दुचाकी भेट !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 13, 2023
in बातमी
0
ऍड. प्रकाश आंबेडकरांकडून पक्कं घर नसलेल्या सरपंचाला दुचाकी भेट !
       

अकोला : ना पक्क घरं, ना घरात वीज, बँकेत खातं आहे, पण त्यात रक्कम नाहीये, ना संसार, रेशन कार्डावरही फक्त एकटेच. इतर खर्च करण्याचीही परिस्थिती नसताना ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी उभे केले.

वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच पदाकरीता उमेदवारी जाहीर झाली अन् निवडून येत ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली. हा प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आकोलखेड गावातील. हे सरपंच आहेत दिगंबर पिंप्राळे. सरपंच अजूनही गावात पायी फिरत असल्याचं समजलं आणि त्यांची हलाखाची परिस्थिती पाहून वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरपंच पिंप्राळेंना भन्नाट दुचाकीचे गिफ्ट दिलं. हे गिफ्ट पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

अकोला जिल्ह्यात मागील वर्षी २५८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आकोलखेड ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामस्थांनी अशा उमेदवाराला सरपंच पदासाठी उभे केले, की त्याबद्दल तुम्ही ऐकूनही थक्क व्हाल. दिगंबर पिंप्राळे असं उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव हाेय. त्यांनी एक रुपयाही खर्च न करता विजय मिळवला होता. आता थेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून गिफ्ट मिळाल्याने जिल्हाभर याची चर्चा आहे.


       
Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचे धरणे; पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर : जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

Next Post

अकोल्यातील सामाजिक सौहार्द एका इंस्टाग्राम पोस्ट मुळे दूषित !

Next Post
अकोल्यातील सामाजिक सौहार्द एका इंस्टाग्राम पोस्ट मुळे दूषित !

अकोल्यातील सामाजिक सौहार्द एका इंस्टाग्राम पोस्ट मुळे दूषित !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
बातमी

ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

by Akash Shelar
October 28, 2026
0

ॲड. प्रकाश आंबेडकर : SIR मधून वगळलेली 13 कोटी जनता रस्त्यावर उतरली तर सरकारचे अवघड होईल. मुंबई : निवडणूक काळात...

Read moreDetails
SNDT महिला विद्यापीठ प्रशासनाच्या टाळाटाळीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठिय्या आंदोलन!

SNDT महिला विद्यापीठ प्रशासनाच्या टाळाटाळीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठिय्या आंदोलन!

October 28, 2026
ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

October 28, 2026
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४३ लाखांवर, चांदी मात्र स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४३ लाखांवर, चांदी मात्र स्वस्त

October 28, 2026
ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी 

ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी 

October 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home