Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पोलीस भरती मधील अन्यायकारक अटी रद्द करा – वंचित बहूजन युवा आघाडी.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 15, 2022
in बातमी
0
पोलीस भरती मधील अन्यायकारक अटी रद्द करा – वंचित बहूजन युवा आघाडी.
       

अकोला, दि. १५ – अनेक वर्षे कठोर परिश्रम करणाऱ्या आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरूणीची सरकारने फसवणूक केली असून भरतीत उमेदवार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकेल ही जाचक अट टाकत क्रिमीलेयर लावल्याने पोलिस होण्यासाठी मेहनत करणारे उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे. इतर पदांच्या नियुक्ती साठी इव्हेंट साजरा करणा-या राज्य सरकारने तात्काळ ही अट रद्द करण्याची मागणी वंचित बहूजन युवा आघाडीचे वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली असून अटी रद्द न केल्यास युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशाराही युवा आघाडीने दिला आहे.

राज्यात पोलिस शिपाईच्या १८ हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वाधिक ७००० जागा मुंबई आयुक्तालयांतर्गत आहेत. यामध्ये एका जिल्ह्यात शहर, ग्रामीण व लोहमार्ग पोलिस अशा गटांत भरती होत आहे. मात्र, कोणत्याही एका गटात एकच अर्ज भरता येण्याची अट यामध्ये घातलेली आहे. २०१९ पर्यंत उमेदवारांना कोणत्याही जिल्ह्यातील भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी होती. त्यामुळे एका जिल्ह्यात संधी गेली तरी दुसया जिल्ह्यात सहभागी होण्याची शक्यता होती. ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील, त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता, परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही, असा अर्ज बाद ठरविला जाणार आहे. तसेच क्रिमीलेयरची अट देखील आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो बेेरोजगार अनेक तरुण तरुणी हवालदील आहेत.

एकतर शारीरिक चाचणीत कोणत्याही कारणाने बाद होण्याची शक्यता असते. अशावेळी पुन्हा तयारी करून दुसऱ्या जिल्ह्यासाठी प्रयत्नात यशस्वी होण्याची संधी असते. मात्र, आता ती मिळणार नाही. अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ह्या सर्व उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्रक काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली. मात्र सरकारने त्याची कुठल्याही पद्धतीने दखल घेतलेली नाही.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही भरती सुरू झाली आहे, अश्यावेळी जाचक अटी टाकून आणि बंधने लादून सरकारने बेरोजगार तरुण तरुणीच्या भवितव्याचा खेळ खंडोबा सुरू केला आहे. एकीकडे रोजगार आणि नौकरी देण्याचे नुसते इव्हेंट साजरे करायचे आणि दुसरीकडे अश्या जाटक अटी घालून त्याना संधी नाकारले जाणे हा अन्याय असल्याने वंचित युवा आघाडीने त्वरित शुद्धीपत्रक काढण्याची मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल ह्यांना पाठविलेल्या ई मेल द्वारे केली आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101


       
Tags: MaharashtraMaharashtra policeRajendra PatodeVanchit Bahujan Yuva Aaghadiपोलिस भरतीमहाराष्ट्र
Previous Post

भारतातील कामगार कल्याण आणि कामगार कायद्यांमध्ये डॉ. आंबेडकरांचे योगदान !

Next Post

“भारत जोडो” यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी… !

Next Post
“भारत जोडो” यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी… !

"भारत जोडो" यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी... !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन
बातमी

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

by mosami kewat
February 8, 2026
0

नागपूर: कुही तालुक्यातील मालची येथे एका दलित विधवा महिलेचे ४० वर्षे जुने घर प्रशासनाने बुलडोझर लावून पाडले. या घटनेचा निषेध...

Read moreDetails
वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

February 8, 2026
पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

February 8, 2026
बिल्डर सुशील रहेजा प्रकरण: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर ; न्यायालयाने पोलिसांना फटकारले!

बिल्डर सुशील रहेजा प्रकरण: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर ; न्यायालयाने पोलिसांना फटकारले!

February 8, 2026
नियम कागदावरच, शहर कचऱ्यात! सफाई कर्मचारी गायब असल्याने नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

नियम कागदावरच, शहर कचऱ्यात! सफाई कर्मचारी गायब असल्याने नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

February 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home