Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्वाधार योजनेचा २०० कोटी निधी असतानाही विद्यार्थी लाभापासून ‘वंचित’ !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 14, 2022
in बातमी
0
       

अधिकारी अंडी उबवतात काय? वंचित युवा आघाडीचा संतप्त सवाल

अकोला :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ साठी २०० कोटींचा निधी सर्व विभागीय कार्यालयांना वळता करण्यात आल्यानंतरही सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे तीन महिन्यांपासून विद्यार्थी आर्थिक लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे प्रादेशिक उपायुक्त कार्यालय अंडी उबवण्यात व्यस्त आहेत का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव आणि मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे ह्यांनी उपस्थित केला आहे.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना पात्र असूनही विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता देता यावा म्हणून ही स्वाधार योजना राबविली जाते. मात्र, सर्व विभागीय कार्यालयात २०० कोटींचा निधी उपलब्ध असताना जिल्हा पातळीवर सामाजिक न्याय विभागाला निधीचे वितरण झालेले नाही. तीन महिन्यांपूर्वी निधी मिळूनही  विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक आर्थिक लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहेत.

२०१८-१९ मध्ये २१,६५१ लाभार्थी, २०१९-२० मध्ये १७,१०० लाभार्थी, २०२०-  २१ मध्ये १४,९०८  विद्यार्थ्यांची निवड स्वाधार योजनेसाठी झाली होती.तथापि ,चालू वर्षी अर्थात २०२१-२२ मधील १४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना पहिला व दुसरा  हप्ता अद्यापही देण्यात आलेला नाही.अनुसूचित जाती आणि बौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या मध्ये शैक्षणिक उत्थानासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा बोजवारा वाजविला जात आहे.

११ वी, १२ वी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाप्रमाणे भोजन, निवास, निर्वाह भत्ता देण्यासाठी ही योजना आहे.सदर विद्यार्थी दुर्बल आर्थिक घटकातील असूनही विद्यार्थ्यांना कर्ज काढून घरभाडे, शैक्षणिक साहित्य,खानावळ, पुस्तकांचा खर्च करावा लागतोय. पालकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हा खर्च विद्यार्थ्यांचे आवाक्या बाहेर आहे.अधिकारी गेंड्याच्या कातडीचे असल्याने अनुसूचित जाती आणि बौध्द घटकातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहातून बाद व्हावे ही मनीषा बाळगून काही झारीतील शुक्राचार्य विभागीय समाज कल्याण कार्यालयात बुड टेकवून आहेत. वंचित युवा आघाडीच्यावतीने विभागीय समाज कल्याण कार्यालयांना घेराव घालून ‘जवाब दो’ आंदोलन छेडण्याचा इशारा देखील वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे.


       
Tags: MaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

धार्मिक उन्माद ! कोणाचा? कशासाठी ?

Next Post

आंबेडकरवाद्यांचा 36 चा आकडा कुणाशी?; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खंत.

Next Post
आंबेडकरवाद्यांचा 36 चा आकडा कुणाशी?; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खंत.

आंबेडकरवाद्यांचा 36 चा आकडा कुणाशी?; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खंत.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
बातमी

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

by mosami kewat
June 29, 2026
0

मुंबई: एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते,...

Read moreDetails
पुणे जिल्हा हादरला: साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार व हत्याप्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार व हत्याप्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

June 29, 2026
भाजपचा 'पेपरफुटी' पॅटर्न

भाजपचा ‘पेपरफुटी’ पॅटर्न

June 29, 2026
दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

June 28, 2026
आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

June 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home