Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!

mosami kewat by mosami kewat
November 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!
       

औरंगाबाद : वैजापूर येथील रोहित अनिल पठारे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्यांची समाज कल्याण आयुक्तालयाने दखल घेतली आहे. मयत रोहित पठारे यांच्या कायदेशीर वारसाला शासकीय नोकरी, सानुग्रह अनुदान, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण आणि विशेष जलदगती न्यायालयात खटला चालविण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने समाजकल्याण आयुक्तांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

समाजकल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी हे पत्र जारी केले आहे. या पत्रात संबंधित प्रकरण जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती निवेदनकर्त्याला द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, अत्याचाराचे बळी ठरलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य देण्याच्या योजनेंतर्गत SNA-SPARSH प्रणालीद्वारे सहायक आयुक्त, समाजकल्याण, औरंगाबाद यांना १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही आयुक्तालयाने पत्रात नमूद केले आहे. आयुक्तालयाच्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रोहित अनिल पठारे व त्यांच्या कुटुंबावर जातीय द्वेषातून गंभीर हल्ला करण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात केला आहे. आरोपींनी केलेल्या अमानुष मारहाणीत उपचारादरम्यान रोहित पठारे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी ११ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण आयुक्तालयाकडे निवेदन सादर करून पीडित कुटुंबासाठी विविध मागण्या केल्या होत्या.

मृताच्या पत्नीला ९० दिवसांच्या आत शासकीय नोकरी देण्याची मागणी –

मयत रोहित पठारे यांच्या पत्नी शितल रोहित पठारे यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत तातडीने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडित व्यक्तीचा मृत्यू किंवा हत्या झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसाला, पत्नी किंवा मुलांना ९० दिवसांच्या आत शासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद असल्याचा दाखला निवेदनात देण्यात आला आहे. त्यानुसार पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

८ लाख २५ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानासह पेन्शनची मागणी –

अँट्रॉसिटी नियमांनुसार हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाला देय असलेली ८ लाख २५ हजार रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत किंवा प्रचलित निकषांनुसार देय असलेले अनुदान तातडीने मंजूर करून वितरित करावे. तसेच कुटुंबाला पेन्शन आणि पुनर्वसनाची मदतही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आरोपी आणि त्यांच्या समर्थकांकडून पीडित कुटुंबीयांना धोका असल्याचे नमूद करत रोहित पठारे यांच्या पत्नी, सासू-सासरे आणि दीर यांना २४ तास पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. अँट्रॉसिटी अधिनियम १९८९ मधील कलम १५ अ अंतर्गत पीडित आणि साक्षीदारांना संरक्षण देण्याची तरतूद असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना अभय दिल्याचा पोलिसांवर आरोप होत असून, त्याचीही चौकशी सुरू करावी, अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

या हत्या प्रकरणाचा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवावा आणि पीडित कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी सक्षम विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अँट्रॉसिटी कायद्याचे कलम १४ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत अशा प्रकरणांचा निकाल जलदगतीने लागणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच चार्जशीट दाखल करताना विशेष लक्ष देऊन सर्व संबंधित जबाब आणि पुरावे न्यायालयासमोर मांडावेत, आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सक्षम कायदेशीर यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने शासन आणि प्रशासनाला या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, शासकीय नोकरी आणि पोलीस संरक्षण तातडीने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी निवेदनातून मांडली आहे.

समाज कल्याण आयुक्तालयाने या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिल्याने आता जिल्हा प्रशासन आणि जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती या प्रकरणात काय निर्णय घेते? याकडे पीडित कुटुंबीयांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.


       
Tags: aurangabadMaharashtraRajendra PatodeRohit Pathare Murder CaseVanchit Bahujan Aghadi
Previous Post

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!

by mosami kewat
November 13, 2026
0

औरंगाबाद : वैजापूर येथील रोहित अनिल पठारे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्यांची समाज...

Read moreDetails
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

November 12, 2026
आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

November 12, 2026
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

November 10, 2026
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home