Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

Akash Shelar by Akash Shelar
November 7, 2026
in Uncategorized, बातमी
0
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन
       

पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या रविवार, ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, पुणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती.

८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन होणार असून, यावेळी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

२०२६ च्या मान्सून हंगामात राज्यात पावसाची १८ ते १९ टक्के तूट राहिल्याने ३५८ पैकी सुमारे ३०४ ते ३०५ तालुके दुष्काळग्रस्त झाले आहेत. मराठवाड्यात ३८ टक्के, तर विदर्भात २७ टक्के पावसाची तूट आहे. यवतमाळ, जळगाव, नांदेड, अमरावती, सोलापूर आणि धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. धरणांतील पाणीसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत २३ टक्क्यांनी घट झाली असून भूजल पातळीही खालावली आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि खरीप पिकांच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना सरकारने केवळ पाच हजार रुपयांची मदत आणि काही सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, ही मदतही अद्याप सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, व्यापक नुकसानभरपाई आणि दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याऐवजी सरकारने शेतकरी-कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून बांधकाम कामगार, पेंटर, कंत्राटी कामगार, महिला आणि असंघटित मजूर वर्गाच्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे.

या आंदोलनादरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांसाठी चटणी-भाकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पेन्डॉल उभारून भाकरी तयार करण्यात येणार असून अलुतेदार, बलुतेदार, महिला, युवक आणि सर्व कष्टकरी समूहांना सहभागी करून घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे, मागण्यांचे निवेदन केवळ पाच शेतकऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांप्रति सरकार आणि प्रशासनाला खऱ्या अर्थाने संवेदना असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, महासचिव, महानगर, शहर, तालुका, सर्कल, ग्राम व वॉर्ड शाखांचे पदाधिकारी तसेच महिला आघाडी, युवा आघाडी, कामगार आघाडी आणि पक्षाच्या इतर सर्व आघाड्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व कष्टकरी समूह आणि समविचारी संस्था-संघटनांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, व्यापक नुकसानभरपाई, पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था, शेतकरी-कष्टकरी हिताची धोरणे तसेच शहरांकडे होणाऱ्या संभाव्य स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मजुरांसाठी योग्य नियोजन करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, महासचिव प्रा. सोमनाथ साळुंके आणि राज्य कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील जनतेच्या दुःखात सहभागी होण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी संबोधित केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सदस्य उत्तम वंशी, महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी सदस्य विशाल गवळी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष ताई चव्हाण उपस्थित होत्या. राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आंदोलनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी आणि ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिनिधींना पाठवून आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


       
Tags: kali DiwaliMaharashtrapuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन
Uncategorized

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

by Akash Shelar
November 7, 2026
0

पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...

Read moreDetails
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home