Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
November 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

       

मुंबई : गुजराती उद्योगपतींनी भाजपला आपल्या खिशात ठेवले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून गुजराती उद्योगपतींनी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या मौनाची किंमत मोजून त्यांनाही विकत घेतले आहे आणि आपल्या अंगठ्याखाली दाबून ठेवले आहे, याची जाणीव मात्र कोणालाच नव्हती. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया X अकाउंटवर पोस्ट करत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर सडकून टीका केली आहे. टोरेंट समूहाने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपसह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी या पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्रातील कर्जत येथे गुजरातच्या टोरेंट पॉवर कंपनीच्या १३,५५५ कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू आहे. या प्रकल्पासाठी सह्याद्री परिसरात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याजवळील सुमारे ३२,४९० ते ४८,००० झाडे तोडली जाणार असून, त्यापैकी २,५०० झाडे यापूर्वीच तोडण्यात आल्याचा उल्लेख ॲड. आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, ही काही लपून राहिलेली बाब नाही. कदाचित यामागचे कारण असे असावे की, टोरेंट ग्रुपने इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून भाजपला १३७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. असा मुद्दाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. याच समूहाने काँग्रेसला २२ कोटी रुपये, शिवसेनेला ३ कोटी रुपये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३.५ कोटी रुपये दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय टोरेंट समूहाने आम आदमी पार्टीला ८ कोटी रुपये, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला ७ कोटी रुपये, समाजवादी पक्षाला ३ कोटी रुपये आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला ५० लाख रुपये दिल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Also Read : वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टोरेंट समूहाने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षांना देणग्या का दिल्या, असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षांकडून प्रकल्प मिळवण्यासाठी आणि विरोधी पक्षांचे मौन विकत घेण्यासाठी या देणग्या दिल्या गेल्या असाव्यात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र, सिक्कीम आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये टोरेंट समूहाने आपला व्यवसाय विस्तारला असून, या राज्यांमध्ये कंपनीच्या विविध प्रकल्पांना स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सिक्कीममधील टोरेंट फार्मास्युटिकल्सच्या कारखान्यातून रासायनिक कचरा राणी खोला नदीत सोडला जात असल्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी केलेले आंदोलन तसेच उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जून २०२६ पासून टोरेंटच्या शोमा आणि शशनाई प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेख त्यांनी केला आहे.

काँग्रेस पक्ष क्रोनी कॅपिटलिझमविरोधात लढत असल्याचे सांगतो; मात्र कॉर्पोरेट घराण्यांकडून देणग्या स्वीकारून त्यांच्याशी पडद्यामागून तडजोड केली जात नाही का, असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. कॉर्पोरेट घराण्यांचा विरोध हा काँग्रेससाठी केवळ सौदेबाजीचे हत्यार बनला आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.


       
Tags: bjpCongressElectoral BondsMaharashtramumbaiPoliticalPrakash AmbedkarTorrent GroupTorrent Group Electoral Bonds DonationsVanchit Bahujan Aghadi
Previous Post

जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
November 4, 2026
0

मुंबई : गुजराती उद्योगपतींनी भाजपला आपल्या खिशात ठेवले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून गुजराती उद्योगपतींनी काँग्रेस,...

Read moreDetails
जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

November 4, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

November 4, 2026
विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग!

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग!

November 3, 2026
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home