नवी मुंबई : २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ‘ज्ञानेश कुमार हटाव मार्च’च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा कमिटीच्या वतीने घणसोली आणि साईबाबा नगर येथे जनजागृती करण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
घणसोली येथील वर्षावास धम्मप्रवचन कार्यक्रमात तसेच साईबाबा नगर येथे भेट देऊन उपस्थित नागरिक आणि मतदारांना या मार्चची माहिती देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.
लोकशाहीचे रक्षण, मतदानाचा हक्क आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी या मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या मार्चमध्ये राज्यातील विविध भागांतून लाखो लोक सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले.
या जनजागृती उपक्रमावेळी महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, महासचिव अजय शिंदे, उपाध्यक्ष गौतम कांबळे, संदेश हत्तरगे, अनिल शिंदे गुरुजी, पत्रकार सचिन पुटगे, गजानन जाधव, उत्तम रोकडे, रमेश बनसोडे, रवींद्र सदाफुले, विजय कांबळे, लक्ष्मण सूर्यवंशी, पिराजी दांडगे, अंकुश तेलंगे, एम. डी. गायकवाड यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.




