अकोट : काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. श्याम नेमाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अकोट शहराध्यक्ष श्री. संदेश घनबहादूर यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. डॉ. श्याम नेमाडे हे एमबीबीएस, एमडी असून अखिल भारतीय बारी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अकोटमधील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांनी प्रेरित होऊन वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करण्याच्या भूमिकेतून आपण वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला गती मिळेल आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या प्रवेशप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, गटनेते गजानन भाऊ गवई, सौ. आम्रपाली खंडारे, सौ. संगीताताई अढाऊ, तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, प्रदीप वानखेडे, काशीराम साबळे, मंदाताई कोल्हे, निखिल गावंडे, कांतीराम गहले, इम्रान खान, लताताई कांबळे, स्वप्नील सरकटे, सुभाष तेलगोटे, अनिल गणगगे, लखण इंगळे, संभा थोरात, विक्की तेलगोठे, स्वप्नील घनबहादुर, निलेश झाडे, सुनीता वानखडे, अर्चनाताई वानखडे, अक्षय तेलगोटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र ओइंबे यांनी केले.





