मुंबई : मतदान हे तुमचे स्वातंत्र्य दाखवण्याचा मुख्य मार्ग असून त्यावर सध्या थेट घाला घातला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आज समाजात मिळणारी प्रतिष्ठा आणि लागू असलेले आरक्षण हे केवळ मतदानाचा अधिकार असल्यामुळेच शक्य झाले आहे, असे सांगत त्यांनी उद्याच्या पिढीचे अधिकार वाचवण्यासाठी नागरिकांनी एक दिवस दान देऊन २८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानेश कुमार हटाव’ मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
हा मोर्चा भायखळा येथील जिजामाता उद्यान येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत काढला जाणार आहे.






