Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महापे MIDC मधील कामगारांना थकीत पगार मिळवून देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
October 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महापे MIDC मधील कामगारांना थकीत पगार मिळवून देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

महापे MIDC मधील कामगारांना थकीत पगार मिळवून देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

       

महापे, नवी मुंबई : दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक तयारी सुरू असतानाच, महापे MIDC येथील इंजिनएक्स कंपनीतील ४० हून अधिक कामगारांवर मात्र आर्थिक संकट ओढवले आहे. कंपनीकडून पगार थकीत असल्याने या कामगारांना सणाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या हक्काचे वेतन मिळावे आणि न्याय मिळावा, यासाठी संबंधित कामगारांनी वंचित बहुजन आघाडीकडे धाव घेतली आहे.

कामगारांनी केलेल्या या मागणीची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या पाठीशी उभे राहत थकीत पगार तातडीने देण्याची मागणी केली आहे. कामगार आपल्या कष्टाच्या जोरावर कंपनीसाठी काम करतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मात्र, दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळातही पगार थकीत राहिल्याने कामगारांसमोर घरखर्च, सणाची तयारी आणि इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Also Read : अरुणाचल सीमेवर भारत-चीन सैन्यामध्ये चकमक सुरूच; आयटीबीपीच्या महासंचालकांचा खुलासा

वंचित बहुजन आघाडीने संबंधित इंजिनएक्स कंपनीने कामगारांचे सर्व थकीत पगार तातडीने अदा करावेत, अशी मागणी केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावून त्यांना दिलासा द्यावा. तसेच, कंपनीकडून कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्यास संबंधित प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, कामगारांना त्यांचे हक्काचे वेतन मिळवून द्यावे आणि जबाबदार कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कामगारांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, राजेश भालेराव, गौतम सपकाळे, मुकेश बोधडे, संजय गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इंजिनएक्स कंपनीतील ४० हून अधिक कामगार उपस्थित होते.


       
Tags: EngineX WorkersMahapeMahape MIDCMIDCnavi mumbai
Previous Post

अरुणाचल सीमेवर भारत-चीन सैन्यामध्ये चकमक सुरूच; आयटीबीपीच्या महासंचालकांचा खुलासा

Next Post

आंबेडकरी चळवळीवर शोककळा! ‘प्रबुद्ध भारत’ घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अलोक कांबळे यांचे निधन

Next Post
आंबेडकरी चळवळीवर शोककळा! 'प्रबुद्ध भारत' घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अलोक कांबळे यांचे निधन

आंबेडकरी चळवळीवर शोककळा! 'प्रबुद्ध भारत' घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अलोक कांबळे यांचे निधन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!

by mosami kewat
November 13, 2026
0

औरंगाबाद : वैजापूर येथील रोहित अनिल पठारे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्यांची समाज...

Read moreDetails
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

November 12, 2026
आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

November 12, 2026
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

November 10, 2026
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home