Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

mosami kewat by mosami kewat
October 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन
       
मनमाड: सन २०२६ च्या खरीप हंगामात ‘TRIGGER-1’ (प्रथम कळ) अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या भागातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार परीक्षा शुल्क व इतर शुल्कात माफी मिळावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनमाड येथे गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  

वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास अशोक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार दुष्काळ उपाययोजना लागू करण्यात आल्या असून नाशिक जिल्ह्यातील बाधित क्षेत्रांचाही यात समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार (क्र. परीक्षा/छायता/३२६३) दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शून्य करण्यात यावे व ज्या विद्यार्थ्यांनी आधीच शुल्क भरले आहे, त्यांना ते परत (रिफंड) करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.  

मनमाड व नांदगाव परिसरातील बहुतांश विद्यार्थी शेतकरी व ग्रामीण पार्श्वभूमीचे असल्याने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ते मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही या सवलतीची योग्य माहिती न पोहोचल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.  

निवेदनातील प्रमुख मागण्या:

१) मनमाड व परिसरातील संलग्न महाविद्यालयांना विद्यापीठाच्या परिपत्रकाची काटेकोर व सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत.  

२) महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांची ‘दुष्काळग्रस्त’ (Drought-affected) अशी अचूक नोंद करावी, जेणेकरून शुल्क शून्य होईल आणि पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत.  

३) ज्या विद्यार्थ्यांनी आधीच शुल्क भरले आहे, त्यांना ५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शुल्क परतावा मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे.  

या निवेदनावर शहराध्यक्ष विलास अहिरे यांच्यासह शहर महासचिव अमोल केदारे, जिल्हा नेते दिपक साळवे, काकासाहेब भालेराव, सुनिल बागुल, गौतम कर्डक, पुरुषोत्तम सवारखंडे, रुपेश जाधव, हर्षद माधव कोरपे, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: MaharashtraPolitical Vanchit Bahujan Aghadiमनमाड
Previous Post

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Next Post

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home