Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

समता सैनिक दलाच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
September 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
समता सैनिक दलाच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
       

पूर्णा : भारतीय बौद्ध महासभा, परभणी जिल्हा दक्षिण अंतर्गत तालुका व शहर शाखा, पूर्णा यांच्या वतीने समता सैनिक दलाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर कावलगाव येथे दि. ६ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले. या शिबिराला महिला प्रशिक्षणार्थींसह उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून समता सैनिक दलाचे तेलंगणा प्रांत व नांदेड जिल्हा प्रभारी लेफ्टनंट जनरल आनंद भिरजे, जिल्हा सरचिटणीस गौतम दिपके, संरक्षण जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ कांबळे, जिल्हा संरक्षण सचिव नरेंद्र सोनुले आणि जिल्हा संघटक ॲड. सिद्धार्थ खरे उपस्थित होते.

शिबिरामध्ये समता सैनिक दलाची कार्यपद्धती, शिस्त, संघटनात्मक बांधणी तसेच सामाजिक बांधिलकी याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. जनरल कमांडर अश्विनी खिल्लारे, वाशिम, अशोक कांबळे (माजी जिल्हाध्यक्ष) आणि उमा इंगोळे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. संघटनात्मक शिस्तीसोबतच सामाजिक जबाबदारीचे भान जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिबिरात महिला प्रशिक्षणार्थींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

शिबिराच्या आयोजनासाठी बौद्धाचार्य प्रा. गौतम गायकवाड, तालुका सरचिटणीस राहुल कचरे, तालुका कोषाध्यक्ष केशव मकासरे, तालुका संरक्षण उपाध्यक्ष धारबा धुमाळे, तालुका संस्कार उपाध्यक्ष बौद्धाचार्य कवी उमेश बाऱ्हाटे, शहराध्यक्ष रत्नदीप एंगडे, शहर सरचिटणीस अजय खंदारे, शहर उपाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांच्यासह कावलगाव येथील सुधीर गोडबोले, वर्षा दुधमल, वंदना गायगोधने, गंगाबाई गजभारे, आम्रपाली सातोरे, ललिता सातोरे, कौशल्या दुधमल, मोनिका दुधमल, अंबुताई गायगोधने, वंदना दुधमल, कमल दुधमल तसेच सर्व उपासक-उपासिकांनी सहकार्य केले.

दरम्यान, विविध कार्यकारी सहकारी संस्था, कावलगावचे सचिव राहुल संभाजी गायकवाड यांच्या वतीने शिबिरार्थींसाठी भोजनदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाचे सैनिक राजू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिज्ञा घेण्यात आली आणि सरणत्य गीतेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


       
Tags: MaharashtraPoliticalPurnaSamata Sainik DalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा दिंडोरीत भव्य पक्षप्रवेश व संवाद मेळावा उत्साहात

Next Post

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

Next Post
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट
article

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

by mosami kewat
September 7, 2026
0

- आकाश मनिषा संतराम भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा इतिहास पाहिला, तर जेव्हा जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध किंवा सामाजिक विषमतेविरुद्ध असंतोष...

Read moreDetails
समता सैनिक दलाच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समता सैनिक दलाच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 7, 2026
वंचित बहुजन आघाडीचा दिंडोरीत भव्य पक्षप्रवेश व संवाद मेळावा उत्साहात

वंचित बहुजन आघाडीचा दिंडोरीत भव्य पक्षप्रवेश व संवाद मेळावा उत्साहात

September 7, 2026
सरकारची उच्चस्तरीय समिती म्हणजे परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना – राजेंद्र पातोडे

सरकारची उच्चस्तरीय समिती म्हणजे परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना – राजेंद्र पातोडे

September 7, 2026
MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा

MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home