हिंगोली : जिल्हा परिषद प्रशाला, शिरडशहापूर येथील शिक्षकांच्या गंभीर तुटवड्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा समन्वयक समाजरत्न अनिल कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून शाळेला तब्बल ६ नवीन शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गेल्या काही काळापासून शिरडशहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत अनिल कांबळे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर झाली असून विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनाचा मार्ग सुकर झाला आहे.
Also Read : COEP च्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या पाठपुराव्याला यश; ५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशाची परवानगी
शिक्षक मिळाल्याबद्दल शिरडशहापूरच्या शाळा व्यवस्थापन आणि गावकऱ्यांच्या वतीने अनिल कांबळे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. “शिरडशहापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव कटिबद्ध राहील,” असा विश्वास यावेळी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन
अकोला : पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अकोला महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत तापडिया नगर येथील...
Read moreDetails






