Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

mosami kewat by mosami kewat
August 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
       

यवतमाळ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिका गटनेते व नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी अनोखा सामाजिक काम केले. नगरपालिका कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या माता-भगिनींसाठी त्यांच्या स्वखर्चातून Sanitary Napkin Vending Machine बसविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या मशीनद्वारे महिलांना सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यवतमाळ नगरपालिकेत अध्यक्षांपासून विविध सभापतीपदांपर्यंत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचे मोठे प्रतिनिधित्व असून नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, महिला नेतृत्वाचे प्रतिनिधित्व असतानाही नगरपालिका कार्यालयात कार्यरत महिला कर्मचारी तसेच विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या माता-भगिनींच्या प्राथमिक आणि संवेदनशील गरजांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

महिला कर्मचारी दिवसभर नगरपालिका कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असतात. त्याचबरोबर विविध कामांसाठी अनेक महिला कार्यालयात येत असतात. अशावेळी एखाद्या महिलेला अचानक मासिक पाळी आल्यास सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध नसल्याने होणारी गैरसोय ही केवळ वैयक्तिक अडचण नसून तिच्या आरोग्य, स्वाभिमान आणि सन्मानाशी संबंधित बाब असल्याचे डॉ. नीरज वाघमारे यांनी म्हटले आहे.

रक्षाबंधन म्हणजे केवळ बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधणे नाही; तिच्या अडचणीच्या क्षणी तिच्या सन्मानासाठी भाऊ म्हणून उभे राहणे हीदेखील माझी जबाबदारी आहे, अशी भावना डॉ. नीरज वाघमारे यांनी व्यक्त केली.

महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनसारखी मूलभूत सुविधा प्रशासनाने यापूर्वीच उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मोठ्या विकासकामांसोबतच महिलांचे आरोग्य, सुरक्षितता आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी यांचाही प्रशासनाच्या प्राधान्यक्रमात समावेश असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

रक्षाबंधनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाची यवतमाळमध्ये चर्चा होत असून, महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा भावाकडून बहिणींना सन्मानाची भेट असल्याची भावना व्यक्त होत आहे. 

या कार्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वंचित बहुजन आघाडीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. डॉ. नीरज वाघमारे यांनी महिलांना संदेश देताना म्हटले, माझ्या सर्व माता-भगिनींनो, तुम्ही एकट्या नाही… राखीच्या धाग्यापुरताच नव्हे, तर तुमच्या अडचणीच्या क्षणी तुमच्या सन्मानासाठी तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे.


       
Tags: MaharashtraPoliticalRakshabandhanRakshabandhan celebrationSanitary padVanchit Bahujan Aghadiwomens
Previous Post

म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

Next Post

एक कोटी खर्चून नूतनीकरण… अन् जिजाऊ सभागृह पुन्हा ‘गाजर गवताच्या विळख्यात’!

Next Post
एक कोटी खर्चून नूतनीकरण… अन् जिजाऊ सभागृह पुन्हा ‘गाजर गवताच्या विळख्यात’!

एक कोटी खर्चून नूतनीकरण... अन् जिजाऊ सभागृह पुन्हा ‘गाजर गवताच्या विळख्यात’!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home