Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वरळी: अरुणोदय क्रीडा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

mosami kewat by mosami kewat
August 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वरळी: अरुणोदय क्रीडा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 
       

मुंबई : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वरळी येथील जुने व सुप्रसिद्ध अरुणोदय क्रीडा मंडळ, बी.डी.डी. चाळ क्रमांक ९७ यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राकेश बुवा कांबळे आणि मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश दोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले.

या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश दोडके, मुंबई प्रदेशचे माजी उपाध्यक्ष अशोक गुज्जेटी, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मधील प्रभाग क्रमांक १९५ चे उमेदवार ओमकार पवार, वरळी विधानसभा मतदारसंघाचे माजी सचिव इलियास काझी तसेच माजी उपाध्यक्ष गणेश खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच अरुणोदय क्रीडा मंडळ, बी.डी.डी. चाळ क्रमांक ९७, वरळी येथील इयत्ता दहावी, इयत्ता बारावी आणि इतर परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

Also Read : अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे

कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागील उद्देश, देशातील सद्य राजकीय परिस्थिती तसेच या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका याबाबत आकाश दोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळकटी देत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केल्याबद्दल अरुणोदय क्रीडा मंडळ, बी.डी.डी. चाळ क्रमांक ९७, वरळी यांचे वंचित बहुजन आघाडी, वरळी विधानसभा यांच्या वतीने मनःपूर्वक जाहीर आभार मानण्यात आले.


       
Tags: EducationMaharashtramumbaistudentVanchit Bahujan AaghadiWorli
Previous Post

अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे

Next Post

लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक- कवी: वामनदादा

Next Post
लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक- कवी: वामनदादा

लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक- कवी: वामनदादा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
बातमी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

by mosami kewat
October 16, 2026
0

दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home