मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरातील चिराग नगर येथे भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली. ही घटना बुधवारी (दि. १२) पहाटे ३.४८ वाजण्याच्या सुमारास घडली. संततधार पावसामुळे टेकडीचा काही भाग खचून जवळील गौशिया चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी रात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेकडीचा काही भाग अचानक खचला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा चाळीतील दोन ते तीन खोल्यांवर कोसळला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Also Read : खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून ढिगारा हटवण्याचे आणि त्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.






