Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

mosami kewat by mosami kewat
August 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 
       
मुंबई : महाराष्ट्रात पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये तसेच पोलीस भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) घटकांच्या जागा जाणीवपूर्वक कमी अथवा शून्य दाखवून मागासवर्गीय तरुणांवर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या गंभीर प्रश्नावर पक्षाच्या राज्य कमिटीने ठामपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला असून, पवित्र पोर्टलची जाहिरात तत्काळ मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामध्ये जाणीवपूर्वक अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी समाजाच्या जागा कमी करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रात झालेल्या पोलीस भरतीमध्येही सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये या मागासवर्गीय घटकांसाठीच्या जागा थेट ‘शून्य’ दाखवून भरती पार पाडली आहे, असा थेट आरोप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. शासनाने पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीची जाहिरात तत्काळ मागे घ्यावी, पोलीस भरतीतील या प्रकाराची योग्य चौकशी व्हावी आणि रोस्टर (बिंदू नामावली) पद्धतीचे काटेकोर पालन करूनच आरक्षणानुसार नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारकडे करण्यात येत आहे. सरकारने या मागण्या त्वरित मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

Tags: Fill Teacher VacanciesMaharashtraPavitra portalRoster Based Recruitment DemandedTeacher Recruitment
Previous Post

लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

Next Post

मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home