Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी
       
नाशिक : शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक महानगरपालिका प्रशासनाविरोधात अनोखे तिरडी आंदोलन करण्यात आले. राजीव गांधी भवन येथील नाशिक महानगरपालिका कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे. 

राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांनीही नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था मान्य केली असून, शहरातील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याने तातडीने रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान खड्ड्यांसाठी जबाबदार असल्याचा आरोप करत मंत्री, आमदार, महायुतीतील नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिका प्रशासन यांची प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: MaharashtranashikVanchit Bahujan Aghadi
Previous Post

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

Next Post

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

Next Post
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home