नवी दिल्ली : देशपातळीवरील नीट (NEET) पेपर लीक प्रकरण आणि विविध प्रतियोगी परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या विरोधात प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा प्रणालीत पूर्ण सुधारणा करण्याची प्रमुख मागणी वांगचुक यांनी केली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे भेट देणार असल्याचे त्यांनी ट्विट द्वारे म्हटले आहे.






