Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
July 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील आदिवासी पाड्यात आजही नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारणार असून, आवश्यक असल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर (बीएमसी) दुसऱ्या क्रमांकाची, तसेच महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत हा आदिवासी पाडा येतो. मात्र, येथे आजही वीज आणि सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. (Navi Mumbai Tribal Hamlet)

Also Read : पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान’चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आदिवासी पाड्यातील अनेक कुटुंबांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह मोडकळीस आले असून त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Navi Mumbai Tribal Hamlet)

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची नवी मुंबई टीम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहे. यासंदर्भात अधिकृत पत्रव्यवहार करण्यात येणार असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी दिली.

Tags: MaharashtramumbaiNavi Mumbai Tribal HamletPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान’चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

Next Post

आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

Next Post
आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
बातमी

मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

by mosami kewat
July 6, 2026
0

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरू असतानाच मानखुर्द परिसरात रविवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या...

Read moreDetails
आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

July 6, 2026
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

July 6, 2026
पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान'चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान’चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

July 6, 2026
हेडगेवारांच्या नाटकासाठी ४५ लाखांचा निधी; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

हेडगेवारांच्या नाटकासाठी ४५ लाखांचा निधी; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home