Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान’चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

mosami kewat by mosami kewat
July 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान'चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान'चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

पुणे : पुणे स्टेशन परिसरातील जय जवान नगर, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालया शेजारील उद्यानाचा अधिकृत नामफलक बदलण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान” असा नवीन नामफलक लावला.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मधील या उद्यानाचे उद्घाटन सन १९९१ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने “साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान” या नावाने करण्यात आले होते. मात्र, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्रीशिक्षणाच्या जनक, स्त्रीमुक्तीच्या अग्रदूत आणि सामाजिक क्रांतीच्या महानायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केवळ “साध्वी” या उपाधीत मर्यादित करणे हा त्यांच्या कार्याचा अवमान असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. (Krantijyoti Savitribai Phule Park)

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने सातत्याने पाठपुरावा, निवेदने आणि आंदोलने केली. त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडे नाव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अखेर ३ मार्च २०२६ रोजी महापालिकेच्या नाव समितीने “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान” हे नाव अधिकृतपणे मंजूर केले.

मात्र, ठराव मंजूर होऊन अनेक महिने उलटूनही ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाने अधिकृत नामफलक बदलण्याची कार्यवाही केली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने निषेध नोंदवत स्वखर्चाने नवीन नामफलक उभारला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा केवळ नामफलक नसून महापुरुष आणि महामातांच्या सन्मानासाठी दिलेल्या संघर्षाचा विजय आहे. सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाच्या लढ्यात अशा प्रश्नांवर यापुढेही ठाम भूमिका घेतली जाईल. (Krantijyoti Savitribai Phule Park)

या प्रसंगी किशोर रिकिबे (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा), युवा नेते मयुर गायकवाड, आकाश कासले (उपाध्यक्ष), अमर सावंत (महासचिव), शिवा डावरे (पुणे शहर सचिव), कृष्णा मोरे (विधानसभा सचिव), अमोल मेघडमबर (संघटक), विनोद सूर्यवंशी (शाखाध्यक्ष), अज्जू शेख, संतोष बनसोडे, राजू गायकवाड, भगवान सोनवणे, अर्जुन कांबळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Krantijyoti Savitribai Phule ParkMaharashtrapunesavitribai phuleVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

हेडगेवारांच्या नाटकासाठी ४५ लाखांचा निधी; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home