Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भटके-विमुक्तांच्या घरगणना-जनगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा समारोह’ उत्साहात; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
June 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भटके-विमुक्तांच्या घरगणना-जनगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा समारोह’ उत्साहात; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
       
श्रीगोंदा : भटके-विमुक्त समाजाची अचूक घरगणना आणि जनगणना व्हावी, तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी प्रभावी धोरणे आखली जावीत, या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘मुशाफिरी यात्रा’चा समारोप सोमवारी (दि. २९ जून) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील भिल्ल वस्ती (धनगर वस्ती) येथे उत्साहात पार पडला.

या समारोप समारोहाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यात्रेदरम्यान भटके-विमुक्त समाजातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी माध्यमांशी सुजात आंबेडकर म्हणाले की, “भटके-विमुक्त समाजासमोरील प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे असतील, तर महाराष्ट्राची सत्ता समाजाने स्वतःच्या हातात घ्यावी लागेल. सत्ता मिळविल्याशिवाय पर्याय नाही. प्रस्थापितांनी केवळ सत्ताधारी, उद्योगपती, कारखानदार किंवा जमीनदारांची मुलेच राजकारण करू शकतात, असा समज समाजात रुजवला आहे. हा समज मोडून भटके-विमुक्त समाजातील नेतृत्व सत्तेत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत इंदापूरसह अनेक ठिकाणी भटके-विमुक्त समाजावर अन्याय-अत्याचार झाले. श्रीरामपूर येथे कबुतर चोरीच्या संशयावरून भटके-विमुक्त समाजातील तरुणांना तीन दिवस उलटे टांगून अमानुष मारहाण करण्यात आली. अशा घटना समाजाची वस्तुस्थिती दर्शवतात.

सुजात आंबेडकर यांनी सांगितले की, आज भटके-विमुक्त समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून, या समाजाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहे. वंचित बहुजन आघाडी भटके-विमुक्त समाजातील उमेदवार तयार करून त्यांना सत्तेत पाठवण्याचे काम करत आहे. समाजातील प्रतिनिधीच समाजासाठी प्रभावीपणे लढू शकतो, हा आमचा विश्वास आहे.

यावेळी त्यांनी टीईटी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, टेलिग्राम बंद करून पेपरफुटी थांबणार नाही. पेपर तुमच्याच विभागातून फुटत असेल, तर ॲप बंद करण्यापेक्षा स्वतःच्या विभागाची चौकशी करा. टेलिग्राम बंद केला तर व्हॉट्सॲपवर पेपर जाईल, व्हॉट्सॲप बंद केला तर फेसबुकवर जाईल, तेही बंद केले तर इतर मार्गाने माहिती बाहेर येईल. त्यामुळे पेपरफुटी रोखण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा. ती करण्याची हिंमत नसेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुजात आंबेडकर म्हणाले.

Tags: MaharashtraPoliticalShrigondaSujat Ambedkar
Previous Post

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

Next Post

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

Next Post
तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा
बातमी

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

by mosami kewat
August 31, 2026
0

नांदेड : ५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक २६ नुसार विविध शासकीय विभागांमधील लघुलेखक (Stenographer)...

Read moreDetails
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home