Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

mosami kewat by mosami kewat
June 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्रातील TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील अपयशावर सरकारला धारेवर धरले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ‘धर्म स्वातंत्र्य अधिनियम’ आणून धर्मांतरावर निर्बंध घालणे, ‘जन सुरक्षा विधेयकाच्या’ माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहमती आणि लोकशाही अधिकारांवर गदा आणणे, अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी असलेल्या निधीचा गैरवापर करणे, आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम रोखणे आणि बुद्ध विहारांवर कारवाई करणे या गोष्टींना सरकारने प्राधान्य दिले. मात्र, ‘डबल इंजिन सरकार’ असल्याचा दावा करणाऱ्या भाजपप्रणीत महाराष्ट्र सरकारला TET पेपरफुटी रोखण्यात अपयश आले आहे, अशी टीका त्यांनी केली.

Also Read : TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – सुजात आंबेडकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्राधान्यक्रमांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच, “आता या घटनेसाठी सरकार पाकिस्तान, बांग्लादेश किंवा घुसखोरांना जबाबदार धरणार का?” असा उपरोधिक सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सध्या TET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत आहे.

Tags: Devendra FadnavisEknath ShindeMaharashtraMaharashtra governmentMaharashtra TET Paper LeakpoliticsPrakash AmbedkarPrakash ambedkar news
Previous Post

TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – सुजात आंबेडकर

Next Post

दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

Next Post
दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home