मौदा (नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात भेंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील मांगली (गोसाई) गावात काही समाजकंटकांकडून गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी गावाला भेट देऊन संबंधित गरीब कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
गावकऱ्यांशी चर्चा करताना असे समोर आले की, गावठाण हद्दीतील अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा देण्याबाबत काही शासकीय अधिकाऱ्यांकडून सरपंचांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
Also Read : जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव
शेतीमजुरी व शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या गरीब कुटुंबांना पावसाळ्याच्या तोंडावर बेघर केल्यास त्यांनी कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय दबावाचा वापर करून गरीब कुटुंबांना बेघर करणे अन्यायकारक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने सरपंच भोयर यांची भेट घेऊन संबंधित गरीब कुटुंबांना मालकी हक्काचे पट्टे मिळेपर्यंत त्यांना गावठाण हद्दीतील जागेवरून हटविण्यात येऊ नये, अशी मागणी केली. अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
यवतमाळ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिका गटनेते व नगरसेवक...
Read moreDetails






