नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी सादेख अली यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...
Read moreDetails






