Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

ए आय मधील महागुंतवणूक: कॉर्पोरेट भांडवलशाहीचा आत्मघातकी प्रवास?

mosami kewat by mosami kewat
May 30, 2026
in article, अर्थ विषयक, सामाजिक
0
ए आय मधील महागुंतवणूक: कॉर्पोरेट भांडवलशाहीचा आत्मघातकी प्रवास?
       

– संजीव चांदोरकर 

स्वतःच स्वतःचा नाश करणारे, suicidal प्रवृत्ती असणारे कॉर्पोरेट भांडवल! .. 

…आणि त्या प्रणालीचे प्रवक्ते भांडवल शाही विरोधी म्हणून बदनाम करतात डाव्याना ! स्वतःमधील आत्मघातकी प्रवृत्ती बद्दल हे प्रवक्ते काहीही बोला नाहीत 

Jefferies हे अमेरिकेतील एक मोठे ब्रोकरेज हाऊस आहे. आणि भारतासकट अनेक देशात गुंतवणूक व्यवहार आहेत. 

त्याचे प्रमुख ख्रिस वूड हे Greed and Fear (हाव आणि भय) या नांवाने एक साप्ताहिक न्यूजलेटर लिहितात.

अलीकडच्या न्यूजलेटर मध्ये त्यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात होणाऱ्या महाकाय भांडवल गुंतवणुकीकडे लक्ष वेधले आहे. 

अमेरिकेतील गुगल, मेटा, ऍमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या फक्त चार कंपन्या मिळून वर्षभरात ७०० बिलियन डॉलर्स ( म्हणजे ६७ लाख कोटी रुपये)  भांडवल गुंतवणुक करणार आहेत. ए आय क्षेत्रातील दुसऱ्या लहान मध्यम कंपन्यांची भांडवल गुंतवणुक वेगळीच. 

गुंतवणुकीमुळे अमेरिकेत भांडवलाचा मोठ्या प्रमाणावरती नाश होऊ शकतो असा इशारा दिला आहे. त्याचा अर्थ असा की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ज्या प्रमाणात वाढत जाईल त्या प्रमाणात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडू शकतात. आणि त्या उद्योग व्यवसायात घातलेले भांडवल मोठ्या प्रमाणावर निरुपयोगी ठरू शकते. मृत होऊ शकते.

गेल्या ४० वर्षात बेबंद भांडवलशाही, मार्केट शक्तींनी किती उत्पादक भांडवलाचा कायमचा नाश केला…. याची आकडेवारी ही लोकं कधीही गोळा करणार नाहीत. मिळेल त्यावेळी डोळे विस्फारतील 

 त्या भांडवलातून ना काही वास्तुमाल सेवा उत्पादन होतील, ना विक्री होईल, ना परतावा मिळेल…आज हे उद्योग व्यवसाय जी रोजगारनिर्मिती करत आहेत ती देखील बंद होईल. 

त्यासाठी त्यांनी इतिहासातील काही दाखले दिले आहेत (संदर्भ इकॉनॉमिक टाईम्स ३० मे, पान क्रमांक १०)

वीज, पाण्याची उपलब्धता कमी होणे, त्याचा किंमती वाढणे यांच्या किंमती नागरिक मोजणार आहेत. त्याची डॉलर, रुपयातील किंमत मोठी असणार आहे. 

मोठ्या प्रमाणावरती पाणी आणि वीज वापरणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्योगाचे पर्यावरणावर होणारे परिणाम याची डॉलर किंवा रुपयातली किंमत अजून चर्चेत देखील नाही. 

प्रश्न असा विचारावयास हवा की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समाजाला, अर्थव्यवस्थेला नेट गेन काय ? पुढचा प्रश्न…. कोणत्या समाज वर्ग घटकांना लाभ होणार आणि कोणते समाज वर्ग घटक त्याची किंमत मोजणार). 


       
Tags: AIArtificial Intelligenceinvestment
Previous Post

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

Next Post

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; माण-खटावमधील मुस्लिम व बहुजन समाजाची तहसीलदारांकडे मागणी

Next Post
गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; माण-खटावमधील मुस्लिम व बहुजन समाजाची तहसीलदारांकडे मागणी

गायीला 'राष्ट्रीय पशू' घोषित करा; माण-खटावमधील मुस्लिम व बहुजन समाजाची तहसीलदारांकडे मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद
बातमी

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

by mosami kewat
July 26, 2026
0

- संजीव चांदोरकर  दिल्लीत पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले जंतर-मंतर वरील विद्यार्थी तरुणांचे आंदोलन पुराचे पाणी पसरते तसे देशभर पसरत चालले...

Read moreDetails
अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

July 26, 2026
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

July 25, 2026
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home