Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
May 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

औरंगाबाद : जानेफळ (ता. वैजापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायत अधिकारी जानेफळ आणि गटविकास अधिकारी वैजापूर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जानेफळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी पंचायत समिती वैजापूर कार्यालयासमोर सखाराम शिनगारे, सिद्धार्थ बागुल तसेच काही वयोवृद्ध महिला १८ मेपासून आमरण उपोषण करत आहेत.

Also Read : Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने २४ जून २०२५ आणि १३ मे २०२६ रोजी गटविकास अधिकारी वैजापूर व ग्रामपंचायत अधिकारी जानेफळ यांच्याकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशी संबंधित गंभीर विषय असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला.

तसेच, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करत असून मागासवर्गीय समाजातील नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. उपोषणाला पाच दिवस उलटूनही अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

Also Read : चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या शिष्टमंडळात पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा संघटक राजन किर्तने, पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे आणि युवा पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे आदींचा समावेश होता.

Tags: aurangabadDr Babasaheb AmbedkarMaharashtrapoliticsVanchi bahujan aghadivbaforindia
Previous Post

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

Next Post

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next Post
गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर
बातमी

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
September 21, 2026
0

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत...

Read moreDetails
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home