Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

Akash Shelar by Akash Shelar
May 16, 2026
in बातमी
0
“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !
       
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मातृत्व, प्रसंगावधान आणि धैर्य यांचा प्रत्यय देणारी ही घटना गावकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गंगुबाई गायकवाड या आपल्या घरात चुलीजवळ काम करत होत्या. त्याचवेळी अचानक एक बिबट्या भरधाव वेगाने त्यांच्या घरात शिरला. काही क्षणांसाठी संपूर्ण परिस्थिती भयावह बनली. कारण घराच्या मुख्य दरवाजालगतच त्यांचा मुलगा हरिभाऊ गायकवाड गाढ झोपेत होता. बिबट्याची दिशा थेट झोपलेल्या मुलाकडे असल्याचे लक्षात येताच गंगुबाईंनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान दाखवले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी झोपलेल्या मुलाला बिछान्यासह घराबाहेर ओढून सुरक्षित ठिकाणी नेले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. मुलाला बाहेर काढताच त्यांनी अत्यंत चातुर्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद करत बिबट्याला घरातच कैद केले.

एका वृद्ध महिलेने दाखवलेले हे धैर्य पाहून गावकरीही थक्क झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

एका आईने संकटाच्या क्षणी दाखवलेले धाडस आणि मुलाच्या जीवासाठी घेतलेला जीवघेणा निर्णय यामुळे गंगुबाई गायकवाड या आज संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भीतीच्या वातावरणातही त्यांनी दाखवलेले धैर्य हे केवळ एका आईचे प्रेम नसून संकटासमोर न झुकणाऱ्या ग्रामीण स्त्रीशक्तीचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Tags: BraveMotherGangubaiGaikwadLeopardRescueSangamner
Previous Post

आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !
बातमी

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

by Akash Shelar
May 16, 2026
0

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची...

Read moreDetails
आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

May 14, 2026
देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

May 14, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

May 13, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

May 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home