Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘Z+’ सुरक्षेबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली; सुमारे 40 ते 50 लाख प्रतिमाह सुरक्षेवर जनतेच्या तिजोरीतून खर्च! 

mosami kewat by mosami kewat
April 21, 2026
in बातमी, राजकीय
0
RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘Z+’ सुरक्षेबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली; सुमारे 40 ते 50 लाख प्रतिमाह सुरक्षेवर जनतेच्या तिजोरीतून खर्च! 
       
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात येणाऱ्या ‘Z+’ सुरक्षा व्यवस्थेच्या खर्चावरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. हा मुद्दा जनहित याचिकेच्या कक्षेत येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारचे गृहमंत्रालय, CISF, RSS आणि राज्याच्या वित्त विभागाला प्रतिवादी करण्यात आले होते. याचिकेनुसार, मोहन भागवत यांना दिल्या जाणाऱ्या Z+ सुरक्षेचा खर्च दरमहा सुमारे ४० ते ४५ लाख रुपये असून तो करदात्यांच्या पैशातून केला जात आहे. हा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

याचिकाकर्त्याने २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा दाखला देत, अशा सुरक्षेचा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच याबाबत अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही कारवाई न झाल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाव्यतिरिक्त ठोस पुरावे किंवा कायदेशीर आधार सादर करू शकले नाहीत. त्यामुळे हा विषय जनहित याचिकेअंतर्गत ग्राह्य धरता येणार नाही, असे सांगत खंडपीठाने याचिका फेटाळली.

Tags: nagpurrssRSSHeadquartersZ + security
Previous Post

एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 

Next Post

महापुरुषांच्या विचारांतूनच भटके-विमुक्त आदिवासी समाजाला न्याय : अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव

Next Post
महापुरुषांच्या विचारांतूनच भटके-विमुक्त आदिवासी समाजाला न्याय : अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव

महापुरुषांच्या विचारांतूनच भटके-विमुक्त आदिवासी समाजाला न्याय : अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home