Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

mosami kewat by mosami kewat
April 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री
       

यवतमाळ : जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा दिग्रस–दारव्हा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दमदार पाऊल टाकत संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. एकेकाळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रभावाखाली आहे. मात्र, या भागात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग असल्याने पक्षाने येथे आक्रमक मोहीम सुरू केली आहे.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दारव्हा तालुक्यातील मौजे बोधेगाव, पिंपळगाव, तरनोळी, करजगाव आणि तरोडा या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाच ग्राम शाखांचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी उपस्थित पदाधिकारी, महिला व कार्यकर्त्यांना संबोधित करताना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला भरभरून साथ देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात पक्षाची संघटनात्मक उभारणी वेगाने सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक जाधव, तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे, महासचिव गौतम मुजमुले, महिला आघाडीच्या शारदा धवणे, नोगीता बोरकर, जया नाईक, अविनाश गुरदे, खडसे, प्रल्हाद बरडे, प्रकाश चव्हाण, आकाश खडसे यांच्यासह अनेक महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, दिग्रस, दारव्हा आणि नेर तालुक्यात येत्या काही दिवसांत किमान ५० ग्राम शाखांचे अनावरण करण्याचा संकल्प असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी दिली.


       
Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan AaghadiYavatmal
Previous Post

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

Next Post
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन
बातमी

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

by mosami kewat
May 30, 2026
0

ठाणे : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन...

Read moreDetails
गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

May 30, 2026
सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

May 30, 2026
मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

May 30, 2026
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

May 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home