Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

mosami kewat by mosami kewat
April 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

       

अधिकारी वर्गावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याची मागणी – जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेले तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले. हतनोरे गावातील गट क्रमांक ५ व ६ मधील जमिनी संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते.

संबंधित जमीन ही दलित व आदिवासी समाजाशी निगडीत असल्याचा दावा करण्यात आला असून, ती जमीन भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध करण्यात आला. “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” या घोषवाक्याखाली आंदोलकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Also Read : पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “दलित व आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.

अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल.” या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मा. तहसीलदारसाहेब व प्रशासनाकडे सादर केले असून, लवकरात लवकर योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील टप्प्यात मोठा संघर्ष उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Also Read : ‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

या आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेड, दिंडोरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते, या आंदोलनात तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, महासचिव समाधान शिरसाठ, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अहिरे, तालुका उपाध्यक्ष सागर गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख साहिल गांगुर्डे, सदस्य अमोल सोनवणे, देवसिंग खरे, वाल्मीक गायकवाड, संदीप बर्वे, ऋषी गांगुर्डे, अरुण गायकवाड, रोहिदास शिरसाठ, मातृशक्ती संघटना प्रमुख संगीता घिसाडे, बिरसा ब्रिगेड सह्याद्री अध्यक्ष नवनाथ लहानगे, बिरसा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सर्जेराव भारमल, तसेच तालुका कमिटी सदस्य नाना कडाळे, सुदाम भोये, सागर पांढरे, राहुल जाधव, सोमनाथ जगताप, किरण गांगुर्डे यांच्यासह गणेश जाधव, ठकुबाई गारे, सुला चारोस्कर, गणेश दुशिंग, रुपेश बोरस्ते, बापू गांगुर्डे, सागर चारोस्कर आणि असंख्य महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्यामध्ये विविध पदाधिकारी व स्थानिक नेत्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.


       
Tags: Atrocity ActBirsa BrigadeDalit RightsDindoriLand RightsMaharashtra newsNashik ProtestPeople PowerRasta RokoSocia lJusticeVanchit Bahujan AghadiVBA protest
Previous Post

पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

Next Post

खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

Next Post
खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट
बातमी

लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट

by mosami kewat
August 12, 2026
0

नांदेड : लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वजाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यात आला आहे. या ठिकाणी सन १९९२ पासून...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

August 12, 2026
शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक

शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक

August 11, 2026
नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

August 11, 2026
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

August 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home