Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

mosami kewat by mosami kewat
April 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन
       
नांदेड : नांदेड दक्षिण येथील विष्णुपुरी ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न पंधरा ते वीस दिवसांत निकाली काढून त्यांची शैक्षणिक फी परत करण्याचे लेखी आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.

ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेज, विष्णुपुरी येथील BMLT व BMIT या अभ्यासक्रमांच्या २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अद्याप नोंदणी क्रमांक मिळालेला नाही. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक नुकसान झाले असल्याची तक्रार आहे. (Nanded News)

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांना जाब विचारण्यात आला. यावेळी प्रश्न तत्काळ सोडवला नाही तर या प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर यांची मदत घेण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, वंचित बहुजन आघाडी नेहमीच मदतीला धावून येते, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. (Nanded News)

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हा महासचिव रवि पंडित, महानगर युवा अध्यक्ष सुखा सिंग टाक महाराज, युवा नेते शुद्धोधन कापसीकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष राज बुध्दे, सम्राट आढाव, प्रा. राजेश ढवळे, विठ्ठल, अतुल मांजरमकर, पंढरी ठाकुर, स्वप्निल बुध्दे, नागेश वडवळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: collegeEducation NewsMaharashtranandedPoliticalstudentVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!

Next Post

पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

Next Post
पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा
बातमी

घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा

by mosami kewat
June 15, 2026
0

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने मूल्यांकनाच्या नावाखाली नागरिकांवर तिप्पटपेक्षा अधिक घरपट्टी वाढ लादल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी...

Read moreDetails
वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

June 15, 2026
जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश

जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश

June 15, 2026
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

June 15, 2026
बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी !

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

June 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home