Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धर्मांध शक्तींना आणि प्रस्थापितांना धडा शिकवा; राहुरीत वंचितचा ऐतिहासिक ‘एल्गार’!

mosami kewat by mosami kewat
April 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धर्मांध शक्तींना आणि प्रस्थापितांना धडा शिकवा; राहुरीत वंचितचा ऐतिहासिक 'एल्गार'!

धर्मांध शक्तींना आणि प्रस्थापितांना धडा शिकवा; राहुरीत वंचितचा ऐतिहासिक 'एल्गार'!

       

९ एप्रिलला ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत होणार प्रचाराचा शुभारंभ

राहुरी: “देशात आणि राज्यात हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढून सर्वसामान्यांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून भरकटवणाऱ्या धर्मांध शक्तींना आता खतपाणी घालू नका. विकासाच्या नावावर शून्य आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरसेवक, शेतकरी पुत्र संतोष चोळके यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात आला.

Also Read : तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

या मतदारसंघातील नगर आणि पाथर्डी तालुक्यातील गावांना प्रस्थापितांनी केवळ मतपेढी म्हणून वापरले, असा आरोप साठे यांनी केला. “एका गरीब मराठा कुटुंबातील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला, संतोष चोळके यांना उमेदवारी देऊन वंचितने प्रस्थापितांच्या घराणेशाहीला थेट आव्हान दिले आहे. ही निवडणूक सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि उपेक्षितांच्या अस्तित्वाची लढाई आहे,” असेही ते म्हणाले.

साठे पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही, दुधाला दर नाही आणि शेतीला दिवसा वीज नाही. या प्रश्नांवर बोलायचे सोडून प्रस्थापित नेते केवळ भावनिक राजकारण करत आहेत. राहुरी आणि नगर तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी वणवण करावी लागते. एमआयडीसी आणि स्थानिक उद्योगांचा पत्ता नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी संतोष चोळके यांच्यासारख्या जनसामान्यांच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे.”

Also Read :
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय ॲड. प्रकाश आंबेडकर हे येत्या ९ एप्रिल २०२६ रोजी राहुरी तालुक्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य मेळाव्याद्वारे प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला जाईल. या सभेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.

“ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले आहे.

Also Read : दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

२२३-राहुरी विधानसभा मतदारसंघातील गावागावांमधील जनतेने आणि राहुरी तालुक्यातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे कळकळीचे आवाहन योगेश साठे यांनी केले आहे.


       
Tags: AhmednagarBy ElectionCampaign LaunchElection 2026Farmer IssuesGrassroots PoliticsMaharashtra politicsPolitical RallyPrakash AmbedkarSocial justice and reservationStop Communal PoliticsVanchit Bahujan AghadiVote For ChangeYouth Unemployment
Previous Post

तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

Next Post

राहुरी पोटनिवडणूक: ९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मेळावा; प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

Next Post
राहुरी पोटनिवडणूक: ९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मेळावा; प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

राहुरी पोटनिवडणूक: ९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मेळावा; प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट
बातमी

लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट

by mosami kewat
August 12, 2026
0

नांदेड : लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वजाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यात आला आहे. या ठिकाणी सन १९९२ पासून...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

August 12, 2026
शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक

शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक

August 11, 2026
नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

August 11, 2026
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

August 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home