नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने बौद्धाचार्य प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता तुर्भे स्टोअर येथील सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर भवन, पंचशील बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विजय झनके गुरुजी होते.
मागील बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थ्यांनी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा दिली होती. त्यापैकी २२ परीक्षार्थी नवी मुंबई जिल्हा केंद्रातून उत्तीर्ण झाले होते. केंद्रिय प्रशिक्षण विभागाकडून प्राप्त झालेली प्रमाणपत्रे यावेळी नवनियुक्त बौद्धाचार्यांना वितरित करण्यात आली. (Navi Mumbai)
Also Read : दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना
कार्यक्रमाची सुरुवात आदर्शांची पूजा करून त्रिसरण पंचशील ग्रहणाने झाली. यानंतर जिल्हाध्यक्ष विजय झनके गुरुजी तसेच उपस्थित जिल्हा कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अजय यशवर्धन गुरुजी यांनी केले. नवनियुक्त बौद्धाचार्यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित बौद्धाचार्यांनी पुढील काळात धम्मकार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी प्रकाश भालेराव, विनोद पाचपिंडे, मधुकर हिवराळे, दत्तात्रय हराळ, दत्तात्रेय भालेराव, कविताताई कांबळे, कल्पना कांबळे, सुरेखाताई सावंत आणि मनिषाताई गंगावणे यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. अप्पासाहेब खंडाळे आणि नितिन बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Navi Mumbai)
Also Read : वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष जाधव, अनिल सुरडकर गुरुजी, सुनिल जाधव गुरुजी, अजय यशवर्धन गुरुजी आणि इतर नवनियुक्त बौद्धाचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्षीय भाषणात विजय झनके गुरुजी यांनी बीएसआय मिशन २५ प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले. प्रत्येक वार्ड शाखेत सभासद नोंदणी वाढवून धम्मचळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना बीएसआय मिशन २५ च्या प्रती वाटप करण्यात आल्या. (Navi Mumbai)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय झनके यांनी केले तर आभार प्रदर्शन राजश्रीताई पारधे यांनी केले. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
