Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे – सुजात आंबेडकर 

mosami kewat by mosami kewat
March 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे – सुजात आंबेडकर 
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रा. विठ्ठल कांगणे यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आल्याच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सरकारचा खरा चेहरा समोर आणणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. विठ्ठल कांगणे हे सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर परखड मत व्यक्त करत होते. मात्र त्यांचे इंस्टाग्राम खाते अचानक बंद करण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Also Read : अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

कांगणे सरांनी भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर सरकारची पोलखोल करणारा व्हिडिओ तयार केला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांचे अकाउंट बंद करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सुजात आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भाजप सरकारवर टीका करणारे, सुधारणा सुचवणारे आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या शिक्षकाचे सोशल मीडिया खाते बंद करणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे.”

Also Read : गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

याआधी कॉमेडियन पुलकित मणी यांची रील हटवण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा आरोप केला.

दरम्यान, “सोशल मीडिया खाते बंद करून सरकार आपले अपयश लपवू शकत नाही. खरात प्रकरणात अडकलेल्या मोठ्या लोकांवर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

शेवटी, “सरकारच्या या हुकूमशाहीविरोधात आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे सरांसोबत ठामपणे उभे आहोत,” असा इशाराही सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

Tags: Anjali AmbedkarEducationInstagram idMaharashtrasocial mediaSujat Ambedkar
Previous Post

अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

Next Post

यूट्यूबर मुकेश मोहन यांच्यावर ५० कोटींचा नोटीस; सरकारविरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
Uncategorized

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

by mosami kewat
August 29, 2026
0

२० वर्षांपासून अमृत नरंगलकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; पात्र लाभार्थ्यांना १० दिवसांत प्लॉट वाटपाची मागणी नायगाव : तालुक्यातील मौजे नरंगल येथे...

Read moreDetails
अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

August 29, 2026
बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन

बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन

August 29, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

August 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

August 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home