Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

mosami kewat by mosami kewat
March 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

       

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करत भारताला हादरवून सोडणारा मोठा कट उधळून लावला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या एका टोळीच्या ९ सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये ५ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या कारवाईमुळे देशातील ७ राज्यांवर घोंघावणारे दहशतवादी सावट तूर्तास टळले आहे.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा कट अत्यंत भयंकर होता. दोन वर्षांपूर्वी रचण्यात आलेला हा कट २०२६ मध्ये अमलात आणला जाणार होता. जम्मू-काश्मीर, दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे त्यांचे नियोजन होते. (Ghaziabad Police Action)

अटक करण्यात आलेल्या मुलांचे वय १५ ते १७ वर्षांच्या दरम्यान असून, त्यातील एक मुलगा अवघ्या ९ वीत शिकत आहे. ही मुले पाकिस्तानातील आपल्या हँडलर्सना लष्करी तळांचे फोटो आणि व्हिडिओ, अदानी आणि अंबानींसारख्या उद्योगपतींच्या घरांची रेकी, देशातील अतिसंवेदनशील ठिकाणांची माहिती पुरवत होती.

पोलिसांनी आरोपींकडून ९ मोबाईल फोन आणि १० सिमकार्ड जप्त केली आहेत. संवादासाठी त्यांनी पाकिस्तानी, मलेशियन आणि ब्रिटिश नंबरचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Ghaziabad Police Action)

या प्रकरणाचा धागा पंजाबमध्ये पकडण्यात आलेल्या सुहेल मलिक उर्फ रोमियो याच्याकडून मिळाला. सुहेलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाल किल्ल्यानंतर जालंधर हे त्यांचे पुढील लक्ष्य होते. मात्र, स्लीपर सेलचा पर्दाफाश झाल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला. आतापर्यंत या टोळीच्या एकूण १५ सदस्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर गाझियाबाद मध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.


       
Tags: CounterTerrorismCrimeNewsGhaziabadIndiaSecurityISINetworkLawEnforcementNationalSecurityPoliceActionPublicSafetySecurityAlertSleeperCellStayAlertTerrorModuleTerrorPlotTerrorThreat
Previous Post

महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

Next Post

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

Next Post
२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
May 23, 2026
0

औरंगाबाद : जानेफळ (ता. वैजापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वंचित...

Read moreDetails
चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

May 23, 2026
Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

May 23, 2026
भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

May 22, 2026
पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home