Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द! 

mosami kewat by mosami kewat
March 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द! 
       

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पीपल्स कॉलेजमध्ये १८ मार्च २०२६ रोजी आरएसएसकडून आयोजित करण्यात आलेला महिला दिनाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामुळे रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्र सेविका समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्र सेविका समितीने (राष्ट्रीय महिला स्वयंसेवक समिती) महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात केले होते. या आयोजनाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तसेच इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले. आणि कार्यक्रमाला विरोध दर्शवून हा कार्यक्रम रद्द केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. (Nanded news)

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक कुलदीप राक्षसमारे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनचे नेते आतिश ढगे, रितेश गुळवे, शंतनु डोंगरे, मीना आरसे, प्रफुल कवडकर, विशाल कदम, प्रबुद्ध काळे, साई पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. (Nanded news)

यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडताना RSS सारख्या संघटनांच्या विचारसरणीला विरोध दर्शविला. त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, आरएसएससारख्या संघटना देशात विष पेरण्याचे काम करत असून, शैक्षणिक संकुलात अशा विचारधारेचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. तसेच यावेळी घोषणाबाजी करत निषेध दर्शवला.


       
Tags: collegeMaharashtraNanded newsPoliticalprotestrssstudentVanchit Bahujan Aghadi
Previous Post

धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

Next Post

‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Next Post
‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

'ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६'ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात
Uncategorized

पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात

by Akash Shelar
May 19, 2026
0

पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे काढणारी एक धक्कादायक घटना कात्रज परिसरात समोर आली आहे. कात्रज चौक ते...

Read moreDetails
गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

May 19, 2026
बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

May 19, 2026
RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

May 18, 2026
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

May 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home