Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
March 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
       

सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील पाझर तलाव आणि साठवण तलावांच्या दुरुस्तीसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बोगस पद्धतीने खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

​अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी, उडगी आणि संगोळगी येथील साठवण तलावांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, तलाव पूर्ण भरण्यापूर्वीच त्यांना भेगा पडल्या आहेत. चिक्केहळ्ळी येथील तलावाच्या भिंतीला १९ सप्टेंबर रोजी मोठे भगदाड पडले. हे लपवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांडवा फोडून पाणी सोडून देण्यात आले, ज्यामुळे खालच्या गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे, विहिरींचे आणि पाइपलाइनचे अतोनात नुकसान झाले आहे. (Vanchit bahujan aghadi)

​उडगी येथे पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरू असताना, १७ जानेवारी २०२५ रोजी ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात तलावाचा बांध फोडण्यात आला. केवळ बोगस बिले उचलण्यासाठी घाईघाईने तीन महिन्यांत हे काम उरकले असून, सध्या या तलावाच्या बांधालाही भेगा पडल्या आहेत.

​प्रशासनाचे दुर्लक्ष आणि इशारा

​या भ्रष्टाचाराबाबत वंचित बहुजन आघाडीने १० ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वप्रथम निवेदन दिले होते. मात्र, चार-पाच महिने उलटूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढीखांबे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. जर तात्काळ चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई केली नाही, तर सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. (Vanchit bahujan aghadi)

​यावेळी अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रतिनिधी रविराज पोटे, वंचितचे नेते यशवंत इंगळे, तालुका महासचिव नितीन शिवशरण, आकाश इंगळे, राजकुमार वाघमारे यांसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: akkalkotMaharashtrasolapurVanchit Bahujan Aaghadiसोलापूर
Previous Post

भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

Next Post

बँकांचे लाखो कोटी रुपये ‘विल्फुल डिफॉल्टर्स’च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

Next Post
बँकांचे लाखो कोटी रुपये 'विल्फुल डिफॉल्टर्स'च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

बँकांचे लाखो कोटी रुपये 'विल्फुल डिफॉल्टर्स'च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home