Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

mosami kewat by mosami kewat
March 12, 2026
in article, अर्थ विषयक
0
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

       

– संजीव चांदोरकर

मागच्या जानेवारीत राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी जाहीर केलेल्या अनेक निर्णयात बदल केले किंवा चक्क मागे घेतले. व्यापार युद्ध, आयात कर लादणे, चीनला धडा शिकवणे, ग्रीनलँड ताब्यात घेणे इत्यादी. त्यामुळे तेथे TACO…म्हणजे Trump Always Chickens Out…. असा नवीन शब्दच तयार झाला.

इराण विरुद्ध एकतर्फी छेडलेल्या युध्दात ट्रम्प पुन्हा चिकन आऊट होतील का याबद्दल अमेरिकेत चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प देखील तसे संकेत देऊ लागले आहेत.

खरेतर ट्रम्प किंवा कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला वेसण घालण्याची घटनादत्त जबाबदारी अमेरिकन काँग्रेसची. पण तीच चिकन आऊट झाली आहे असे दिसते.

पण ट्रम्प यांना वेसण घालण्याचे काम अमेरिकेतील आणि विकसित देशांतील फायनान्शियाल मार्केट करणार असे दिसते.

खनिज तेल…वर खाली होत आहे. १२५ डॉलर्स प्रती बॅरल, १५० डॉलर्स…अनेक अंदाज व्यक्त होत आहेत. अमेरिकेत गॅसोलिन किंमती १७ टक्क्यांनी वाढले आहे.

Dow Jones पाच टक्क्यांनी खाली आला आहे

अमेरिकेन रोख्यांचे भाव वाढून yield कमी होत आहे. तीच स्थिती इतर विकसित देशात आहे. अमेरिकेसह कोणत्याच देशाची केंद्रीय बँक नजीकच्या काळात व्याजदर कमी करू शकणार नाही असा कयास आहे.

युद्धाचे उद्दिष्ट सांगताना ट्रम्प म्हणतात इराण मधील रेजिम चेंज करायची आहे. रेजिम चेंज होऊन अधिक कडवी रेजिम आली तर काय ? याबद्दल ते नेहमीप्रमाणे चूप बसणार आहेत

नोव्हेंबर मध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका आहेत. तेथे राष्ट्राध्यक्ष नाही चेंज झाले तरी संसदेतील रेजिम चेंज होऊ शकते

ही पोस्ट फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यासाठी नाही.

सत्ताकारण, देशातील निवडणुका, कोण सत्तेवर येणार, आंतरराष्ट्रीय व्यापार नीती, परराष्ट्र नीती, भू राजनैतिक सबंध…. हे सारे किती गंभीर विषय आहेत हे अधोरेखीत करण्यासाठी आहे. गंभीर अशासाठी की ते कोट्यावधी नागरिकांच्या आणि पुढील पिढ्यांच्या जीवन मरणाचे भवितव्य ठरवत असतात. जे जिवंत रहातील त्यांच्या दैनंदिन आयुष्याची गुणवत्ता आणि विपन्नावस्था ठरवतात. राजकारण, सत्ताकारण याबद्दल घृणा तयार झाली असली तर त्यावर मात केली पाहिजे.


       
Tags: DonaldTrumpDowJonesGeopoliticsGlobalMarketsGlobalPoliticsInternationalRelationsIranCrisisMiddleEastTensionsOilPricesPoliticalAnalysisTrump and Iran WarTrumpAdministrationUSForeignPolicyUSPoliticsWorldNews
Previous Post

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

Next Post

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

Next Post
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास
बातमी

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

by mosami kewat
April 28, 2026
0

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई-वडिलांसह मुलीचा सत्कार! अकोला : परिस्थिती कितीही बेताची असली, तरी मनात जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर...

Read moreDetails
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026
शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन 

शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन 

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home