Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

mosami kewat by mosami kewat
March 9, 2026
in बातमी, सामाजिक
0
जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण
       
मालेगाव: माळमाथ्याच्या अवर्षणग्रस्त भागातून उंच भरारी घेत प्रेरणा खवळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवत आपल्या कुटुंबासह आपल्या गावाचा अभिमान वाढवला आहे. मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे आणि सुनिता खवळे यांची कन्या असलेल्या प्रेरणाने देशात ९१३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. माळमाथा परिसरातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिली तरुणी ठरली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रेरणाचे आई-वडील दहावीपर्यंत शिक्षित असले तरी त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. प्रेरणासह कुटुंबात चार भावंडे आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण मालेगावातील कॅम्प परिसरातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या भारत विद्यालयात झाले. नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे गेली आणि तेथे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. (UPSC result)

बारावीनंतर प्रेरणाच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. लहानपणापासूनच तिच्या आई-वडिलांची इच्छा होती की मुलगी अधिकारी बनावी. या स्वप्नाला साकार करण्यासाठी प्रेरणाने पदवी शिक्षणासाठी कोल्हापूर येथे आरसीएसएम कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरमधून बीएससी अॅग्रिकल्चरची पदवी घेतली. (UPSC result)

यानंतर तिने पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सलग चार वर्षे यूपीएससीच्या अभ्यासात झोकून देत असताना तिला तीन वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र त्या अपयशाने खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर चौथ्या प्रयत्नात तिने अखेर यश मिळवत देशात ९१३ वा क्रमांक पटकावला.

Tags: EducationMaharashtramalegaonnashikRankUpscUPSC resultVillage
Previous Post

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

Next Post

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन
बातमी

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

by mosami kewat
March 9, 2026
0

मिरा-भाईंदर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read moreDetails
पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

March 9, 2026
राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

March 9, 2026
जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

March 9, 2026
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

March 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home